वांगी लागवड व व्यवस्थापन
लागवडीची वेळ : खरीप जुलै - ऑगस्ट
उन्हाळी फेब्रुवारी - मार्च
बियाण्यांचे प्रमाण : 400 ते 500 ग्रॅम सुधारित व 120 ते 150 ग्रॅम संकरित वाणाची प्रती हेक्टरी रोपवाटिकेत रोपे तयार करावी. (40 ते 45 दिवस)
लागवडीचे अंतर : खरीप 90×90 सेमी
उन्हाळी 120×120 सेमी
खतांची मात्रा : 150:75:75 नत्र : स्पुरद : पालाश किलो/हेक्टर
• रस शोषणारी कीड (तुडतुडे, मावा, पांढरी माशी)
पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वाकतात. किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 इसी 20 मिली किंवा क्विनॉल्फोस 25 ईसी 20 मिली किंवा फेंप्रोपथरीन 30 ईसी 5 मिली या कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात. पिवळे चिकट सापळे लावावेत (2 - 3 सापळे/एकर)
• शेंडा व फळे पोखरणारी अळी
वांग्यावर विशेषतः शेंडे पोखरणारी अळी जास्त प्रमाणात दिसून येते. या किडीमुळे फळांचे 40 ते 50 टक्के नुकसान होऊ शकते. याच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास गोळा करून नष्ट करावेत किंवा खोल खड्यात पुरून टाकावेत. तसेच 4% निंबोळी अर्क किंवा मोनॉक्रोटॉफोस 0.05% किंवा सायपरमेथरिन 25 टक्के प्रवाही 5 मिली किंवा क्लोरोपायरिफॉस 20 ईसी 20 मिली किंवा डेल्टामेथरिन 1टक्का + ट्रायझोफॉस 20 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
• बोकड्या/पर्णगुच्छ
या रोगामुळे वांग्याची झाडे लहान आणि बोकडल्यासरखी दिसतात.या रोगाचा प्रसार तुडतुडयामुळे होतो. याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी म्हणजे याचा प्रसार होणार नाही.तसेच डायमेथोएट 20 मिली 10 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 3 - 4 फवारण्या घ्याव्यात. रोगट झाडे दिसतात ती उपटून नष्ट करावीत.
• फळकुज
हा रोग होवू नये यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी. नर्सरीमध्ये तसेच रोगाची लक्षणे दिसताच कार्बेन्डाझिम 0.01 % फवारणी 10 दिवसांच्या अंतराने करावी.
• मर रोग
हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो.खालची पाने पिवळी पडून गळून जातात व रोगट झाडांची वाढ खुंटते.हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होत असल्यामुळे पिकांची फेरपालट करणे, निरोगी झाडांचे बी वापरणे, तसेच प्रतिकारक जातींची लागवड करणे गरजेचे असते.
रोग
Comments
Post a Comment
नमस्कार मित्रांनो