मिरची लागवड
मिरची हे एक भाजीपाला पिकामधील महत्त्वाचे पीक आहे. दैनंदिन जीवनामध्ये मिरचीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. येथे आपण पाहुयात मिरचीची लागवड आणि व्यवस्थापन.
लागवडीची वेळ :
लागवडीची वेळ :
◾खरीप जून - जुलै
◾सरी पद्धत = 60 × 45 सेमी सर्वसाधाणपणे एकरी 14814 रोपे लागतात.
◾बेड पद्धत = 4 फुटी बेडवर लावल्यावर 60 सेमी अंतरावर झीगझॅग पद्धतीने लावावी.
लागवडीसाठी 40 ते 50 दिवसांच्या रोपांची निवड करावी.
खतांची मात्रा : 100:50:50 नत्र : स्पुरद : पालाश किलो/हेक्टर
आंतरमशागत : 15 ते 20 दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे. लागवडीपासून एक महिन्याने वरखताच्या मात्रा द्याव्यात. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी किंवा झाडांना आधार द्यावा म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत.
खत व्यवस्थापन :

सेंद्रिय खते : 20 ते 25 टन/हेक्टर लागवडीपूर्वी 15 दिवस अगोदर जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.
खताच्या मात्रेपैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्पुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरीत 50 किलो नत्र 2 समान हप्त्यात विभागून 30 व 45 दिवसांनी द्यावे.
पाणी व्यवस्थापन : मिरचीला लागवडीपासून सुरवातीच्या वाढीसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे दर आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काही शेतकरी या पिकाची लागवड पट्टा पद्धतीने करतात व पाणी ठिबक पद्धतीने देतात. यामुळे पाण्याची बचत होते व उत्पादनात सव्वा पटीने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
कीड व रोग :
✓ फुलकिडे : फुलकिडे हे पानाच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात. पाने लहान होतात यालाच बोकड्या किंवा चुराडा असे म्हणतात. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 इसी 15 मिली इमिडाक्लोप्रिड 17.8 एसएल 5 मिली किंवा फिप्रोनील 5 एससी 15 मिली या कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात.
✓ कोळी : मिरची पिकावर कोळी आढळल्यास फेनप्रोपॅथ्रिन 30 ईसी 5 मिली किंवा फेनॅक्झाक्वीन 10 ईसी 25 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
✓ फळकुज आणि फांद्या वाळणे :
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हिरव्या किंवा लाल मिरची फळांवर आणि पानांवर वर्तुळाकार गोल डाग दिसतात. दमट हवामानात रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात, फांद्या वाळणे या रोगाची सुरुवात शेंड्याकडून होते. प्रथम शेंडे मरतात. रोगाच्या प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात. तसेच फांद्या आणि पानांवर काळे ठिपके दिसतात. हे रोग कोलेटोट्रीकम या बुरशीमुळे होतात. या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे मोडून त्याचा नाश करावा तसेच मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड या पैकी एक 25 ते 30 ग्रॅम, 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 15 दिवसांच्या अंतराने 3 - 4 फवारण्या कराव्यात.
✓ भुरी रोग : भुरी या रोगामुळे पानाच्या पृष्ठभागावर आणि खाली पांढरी भुरी दिसते. रोग जास्त बळावल्यास पाने गळून पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 2 - 3 फवरण्या दर 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
✓ लिफ कर्ल ( चुरडा मुरडा ) : हा विषणुजन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार फुलकिडे , मावा आणि कोळी या रस शोषून घेणाऱ्या किडीमार्फत होतो. ह्या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे पानातील शिरांमधील भागावर सुरकुत्या पडून संपूर्ण पानाची वाढ खुंटते आणि झाड रोगट दिसते. डायमेथोएट 30 इसी 15 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून दर 15 दिवसांनी 4 ते 5 फवारण्या घ्याव्यात. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील 5 एससी 15 मिली फवारावे.
उत्पादन : हिरवी मिरची 100 ते 200 क्विंटल/हेक्टर
लाल मिरची 15 ते 20 क्विंटल/ हेक्टर
ढोबळी मिरची 15 ते 20 टन/हेक्टर

Comments
Post a Comment
नमस्कार मित्रांनो