Posts

डाळिंब तेलकट डाग रोग (तेल्या)

Image
डाळिंबावरील विविध समस्येपैकी तेलकट डाग रोग (तेल्या) ही एक मोठी समस्या आहे. महाराष्ट्रात या रोगाचा प्रसार रोगग्रस्त कलमामुळे झालेला असून, या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. रोगास अनुकूल बाबी : ✓ बागेत किंवा बागेशेजरी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे, तसेच तणांची मोठ्या प्रमाणावर वाढ असणे. ✓ झाडांची गर्दी तसेच सूर्यप्रकाशाचा व खेळत्या हवेचा अभाव असणे. ✓ ढगाळ  पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणात आद्रता जास्त असणे. ✓ रोगग्रस्त बागेतील गुटी कलमांचा वापर. ✓ रोगग्रस्त बागेत वापरलेल्या हत्यारांचा छाटनिसाठी वापर करणे. शेतात रोपांचे एक वर्षापर्यंत करायचे व्यवस्थापन ✓ रोप कॅल्शियम हायड्रोक्लोराईड ने (100 ग्रॅम/खड्डा) निर्जंतुक केलेल्या खड्यात लावावे. ✓ रोपांची लागवड कमीत कमी 4.5×3.0 मीटर अंतरावर करावी आणि प्रत्येक ठिकाणी तीन खोड ठेवावीत. ✓ स्वच्छता मोहीम काळजीपूर्वक राबवावी. खाली जमिनीवर पडलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. ✓ बहार धरताना जमिनीवरील रोगट जिवाणूंची संख्या कमी करण्यासाठी 150 ग्रॅम/5 - 6 ग्रॅम पाण्यात मिसळून (झाडाच्या

वांगी लागवड व व्यवस्थापन

Image
लागवडीची वेळ : खरीप   जुलै - ऑगस्ट                         उन्हाळी   फेब्रुवारी - मार्च बियाण्यांचे प्रमाण : 400 ते 500 ग्रॅम सुधारित व 120 ते 150 ग्रॅम संकरित वाणाची प्रती हेक्टरी रोपवाटिकेत रोपे तयार करावी. (40 ते 45 दिवस) लागवडीचे अंतर : खरीप   90×90 सेमी                           उन्हाळी   120×120 सेमी खतांची मात्रा : 150:75:75 नत्र : स्पुरद : पालाश किलो/हेक्टर • रस  शोषणारी कीड (तुडतुडे, मावा, पांढरी माशी)       पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वाकतात. किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 इसी 20 मिली किंवा क्विनॉल्फोस 25 ईसी 20 मिली किंवा फेंप्रोपथरीन 30 ईसी 5 मिली या कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात. पिवळे चिकट सापळे लावावेत (2 - 3 सापळे/एकर) • शेंडा व फळे पोखरणारी अळी      वांग्यावर विशेषतः शेंडे पोखरणारी अळी जास्त प्रमाणात दिसून येते. या किडीमुळे फळांचे 40 ते 50 टक्के नुकसान होऊ शकते. याच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास गोळा करून

शेतीमध्ये आच्छादनाचा वापर [मल्चिंग]

Image
आच्छादनामुळे शेतात झाडाजवळील शेत जमिनीचा पृष्ठभाग झाकून ठेवता येतो. त्यामुळे पाण्याची बचत होते व उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होते.पिकाची पाण्याची गरज 20 ते 30 टक्क्यांनी कमी होते तसेच जमिनीत हवा खेळती राहते व तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. राहुरी विद्यापीठात झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की काळया प्लॅस्टिकच्या आच्छादनामुळे पिकानुसर 12 ते 48 टक्के उत्पादनात वाढ होऊन पाण्याची जवळपास 20 टक्के बचत होते. तसेच तन नियंत्रण सरासरी 80 ते 90 टक्के होते. ठिबक सिंचन पद्धतीत आच्छादन केल्याने वेगवेगळया पिकांच्या उत्पादनात 10 ते 80 टक्के लक्षणीय वाढ झाली आहे, तसेच पाण्याची 10 टक्के अतिरिक्त बचत झाल्याचे आढळून आले. आच्छादनाचे विविध प्रकार सेंद्रिय आच्छादन उदा . ज्वारीची धसकटे, तुरकाड्या, वाळलेले गवत, गव्हाचा भुसा व काड, उसाचे पाचट, कपाशीचे काड, वाळलेली पाने यांचा समावेश होतो. असेंद्रिय आच्छादन यामध्ये प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या आच्छादनाचा समावेश होतो. उदा. चंदेरी, काळया, पांढऱ्या, निळ्या, पिवळ्या, लाल, आकाशी, व पारदर्शक रंगाचे प्लास्टिकचे आच्छादन इत्यादी. टोमॅटो या पिकासाठी तांबड्या रंगाचे आच्छा

लष्करी अळीचे मका चारा पिकाचे नियोजन

Image
मका चारा पिकासाठी कीटकनाशकांची शिफारस ⏹ बीज प्रक्रिया : सायानट्रीनीलीप्रोल 19.8% + थायामेथाक्झाम 19.8 एस. एफ. @6 मिली/ किलो. बियाणे प्रक्रिया केल्यास पिकास पाहिले 15-20 दिवस संरक्षण मिळते. ⏹ पहिली फवारणी (रोप अवस्था ते पूर्व पोंग्याची अवस्था) : अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेले नुकसान 5% आढळल्यास निंबोळी अर्क 5% किंवा अझडिरॅक्टीन 1500 पिपिम @5 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास अंडी उगवण्याची क्षमता कमी होते. ⏹ दुसरी फवारणी (मध्य ते उशिराची पोंग्याची अवस्था) : अळीच्या दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत 10% पेक्षा जास्त नुकसान होत आढळल्यास खालील कीटकनाशकांची फवारणी तुरा अवस्थेपर्यंत करू शकतो. सिनेटोराम 11.7% एस. सी. @9 मिली किंवा क्लोराट्रीनीलीप्रोल 18.5 एस.सी. @3 मिली किंवा थायामेथाक्झाम 12.6% ल‌ॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेड.सी. @5 मिली प्रती 10 लिटर पाणी. ⏹ विषारी आमिष : अळी शेवटच्या अवस्थेमध्ये किंवा दुसऱ्या फवारणी नंतर  खालील विषारी आमिष पिकाच्या पोंग्यामध्ये टाकावे. 10 किलो भाताचा कोंडा + 2 किलो गूळ 2-3 लिटर पाण्यात 24 तास आंबवून त्याचा वापर शेतात करण्याच्या अर्धा तास आधी 1

लाल रंगाची फळं आणि भाज्या शरीरासाठी असतात लाभदायक

Image
⏹ टॉमेटोमध्ये लायकोपिन मुबलक प्रमाणात असतं. लायकोपिन प्रोटेस्ट कॅन्सर, ओसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. ⏹ स्ट्रॉबेरीतील पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी इम्यून सिस्टीमसाठी फायदेशीर असतं. ⏹ चेरीमध्ये आढळून येणारं एंथोसियानिन शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. ⏹ लाल राजमा शरीरासाठी लाभदायक असतो. यामध्ये फायबर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं. जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात. ⏹ बीटामध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, नायट्रेट आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते. ⏹ डाळिंबामध्ये असणारे अॅन्टी-ऑक्सिडंट प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात. ⏹ सफरचंदामध्ये असणारी अॅन्टी ऑक्सिडंट कॅन्सर, डायबेटीज, हायपर टेन्शन आणि हृदयरोग यांसारख्या आजारांचा धोका कमी करतं.

एकात्मिक किड व्यवस्थापन - परभक्षी कीटक

Image
 1) क्रायसोपा (क्रायसोपर्ला कार्निया)  क्रायसोपाची अळी व प्रौढ मृद शरीर वर्गीय रस शोषणार्या किडी  उदा. मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, तसेच बोंडअळीची अंडी, प्रथमावस्थेतील अळ्या, पिठ्या ढेकूण व खवले किडींची पिल्ले खाते. यांचा उपयोग कापूस, मका, सूर्यफूल, भाजीपाला व फळबागात आढळून येणार्या वरील किडींच्या नियंत्रणासाठी होतो. प्रसारण मात्रा: १०,००० अळ्या/हेक्टर. 2) ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड भुंगेरे (क्रिप्टोलीमस)- विविध प्रजातींच्या पिठ्या ढेकणाची अंडी, पिल्ले व प्रौढ अवस्थांवर उपजीविका करतात. त्यांचा उपयोग द्राक्ष, सीताफळ, लिंबू, डाळिंब, आंबा, चिकू या वरील पिठ्या ढेकूण, कापशी व उसावरील पिठ्या ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी होतो. प्रसारण मात्रा: २,५०० अळ्या / हेक्टर ३) लेडीबर्ड भुंगेरे:-  बहुतांशी पिकावरील रस शोषणार्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आणि पिठ्या ढेकणाची पिल्ले यावर उपजीविका करतात. हे परभक्षी कीटक कापूस, मका, ज्वारी, उस, गळीतधान्य, भाजीपाला व फळझाडवरील या किडींच्या नियंत्रणाचे कार्य नैसर्गिकरीत्याच करत असतात. 4) डीफा (कोनोबाथ्रा) –  याची अळी उसा

गांडूळ खत

Image
टाकाऊ शेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी गांडूळाच्या उपयोग केला असता गांडूळे सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून चर्वण व पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात. गांडुळाला दानवे, वाळे व केचे या नावाने ओळखतात. गांडूळाच्या अंडी, अपूर्ण आणि पूर्ण अशा तीन अवस्था असून त्या ओलसर जमिनीत पूर्ण होतात. गांडूळ कोरड्या मातीत किंवा पाण्यात जगू शकत नाहीत. गांडूळ खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने इसिनिया फोइटिडा या जातीचा वापर केला जातो. Source गांडूळ खत तयार करण्यासाठी सेंद्रिय पदार्थ :  पिकांचे अवशेष : धस्कटे, ताटे, पेंढा, तुस, उसाचे पाचट, झाडांचा पालापाचोळा, गवत इत्यादी. जनावरांपासून मिळणारे उपउत्पादिते : शेन, मुत्र, कोंबड्यांची विष्ठा, हाडांचा चुरा, कातडी इत्यादी. हिरवळीची खते : ताग, गिरिपुष्प, धैंचा. घरगुती कचरा :  टाकाऊ पालेभाज्या, फळांच्या साली इत्यादी. वनझाडांचा पालापाचोळा : ऐन, साग, सुभाबुळ. गांडूळाची पैदास :  ✓ गांडूळाची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्यासाठी 2 मी लांब, 1 मी रुंद, 30 सेमी उंच लाकडी खोकी, सिमेंटच्या टाक्या अथवा प्लॅस्टिकच्या टबचा वापर करावा. ✓  खोक्याच्या तळाशी साव

रासायनिक का नको ...?

Image
सेंद्रिय शेतीच का करायची  १)जमिनिचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो. विषमुक्त अन्न मिळते,ज्यामूळे धोके टळतात,आजारपण कमी येते. मालाला भाव चांगला भेटतो. २ ) पाण्याची ५० % बचत होते . ३ ) सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते . ४ ) जमिनीची सुपीकता वाढते . ५ ) जमिनीचा पोत वाढतो . ६ ) हवेतील ओलावा ओढून घेते . ७ ) नत्र उपलब्ध होते . ८ ) प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा 'वेग वाढतो. ९ )सजिवता वाढते . १० ) पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते. ११ ) जमिनीत संजिवकांची निर्मिती होते . १२ ) जमिनीत नविन घडण होते . १४ ) पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. १५ ) स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो. १६ ) आंतरकाष्टांगजन्य विघटन. १७ ) मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते. १८ ) सर्वच  रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते . १९ ) जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते. २० ) कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते. २१ ) एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो . २२ ) जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध