लष्करी अळीचे मका चारा पिकाचे नियोजन
मका चारा पिकासाठी कीटकनाशकांची शिफारस
⏹बीज प्रक्रिया : सायानट्रीनीलीप्रोल 19.8% + थायामेथाक्झाम 19.8 एस. एफ. @6 मिली/ किलो.
बियाणे प्रक्रिया केल्यास पिकास पाहिले 15-20 दिवस संरक्षण मिळते.
⏹पहिली फवारणी (रोप अवस्था ते पूर्व पोंग्याची अवस्था) : अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेले नुकसान 5% आढळल्यास निंबोळी अर्क 5% किंवा अझडिरॅक्टीन 1500 पिपिम @5 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास अंडी उगवण्याची क्षमता कमी होते.
⏹दुसरी फवारणी (मध्य ते उशिराची पोंग्याची अवस्था) : अळीच्या दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत 10% पेक्षा जास्त नुकसान होत आढळल्यास खालील कीटकनाशकांची फवारणी तुरा अवस्थेपर्यंत करू शकतो.
सिनेटोराम 11.7% एस. सी. @9 मिली किंवा क्लोराट्रीनीलीप्रोल 18.5 एस.सी. @3 मिली किंवा थायामेथाक्झाम 12.6% लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेड.सी. @5 मिली प्रती 10 लिटर पाणी.
⏹विषारी आमिष : अळी शेवटच्या अवस्थेमध्ये किंवा दुसऱ्या फवारणी नंतर खालील विषारी आमिष पिकाच्या पोंग्यामध्ये टाकावे.
10 किलो भाताचा कोंडा + 2 किलो गूळ 2-3 लिटर पाण्यात 24 तास आंबवून त्याचा वापर शेतात करण्याच्या अर्धा तास आधी 100 ग्रॅम थायोडिकार्ब मिसळावे.
तिसरी फवारणी (उगवणीनंतर 8 आठवडे ते तुरा येईपर्यंत ) या अवस्थेमध्ये कीटकनाशकांचा वापर आर्थिकदृष्ट्या हितकारक नसल्याने वर दिलेले जैविक कीटकनाशक निंबोळी अर्क 5% किंवा अझडिरॅक्टीन 1500 पिपिम @5 मिली प्रती लिटर वापरावे.
फवारणी केलेला मका किती दिवसांनी चाऱ्यासाठी वापरावा
वर फवारणीसाठी शिफारशीत केलेल्या 3 कीटकनाशकापैकी फक्त थायामेथाक्झाम 12.6% लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेड.सी. या कीटकनाशकाचा वापर मका पिकामध्ये वापर कोडकिड, मावा व खोडमाशिसाठी केला जातो व त्याचा प्रतीक्षा कालावधी 42 दिवसांचा आहे या आधारावर मका 42 दिवसांनी चाऱ्यासाठी वापरणे योग्य आहे.
Comments
Post a Comment
नमस्कार मित्रांनो