ऊस लागवड

Maharashtra sugarcane cultivation | High yielding sugarcane | AgriAmigo
लागण वेळ
सुरू : 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी
पूर्वहंगामी : 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर
आडसाली : 15 जुलै ते 15 ऑगस्ट
असे ऊस लागवडीचे हंगाम ऊस उत्पादकता  साखर उताऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
वाणांची निवड
महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव आणि वसंतदादा साखर संस्था, पुणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत अधिक ऊस उत्पादन आणि चांगला साखर उतारा असणाऱ्या अनेक जाती प्रसारित केल्या आहेत. सध्या को. 86032 (निरा), को. 94012 (फुले सावित्री), को.एक.0265 (फुले 265), को.92005, कोसी 671 (वसंत -1), व्ही.एस.आय 434, को.व्ही.एस.आय 9805 (शरद -1), व्ही.एस.आय 08005 या मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली असणाऱ्या जातींची प्रामुख्याने निवड करावी.
जमीन
उसासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. उभी आडवी नांगरट, कुळवणी ई. मशागत करून जमीन चांगली भुसभुशीत करावी.
लागवड
उसाची लागवड करताना मध्यम जमिनीसाठी दोन सऱ्यातील अंतर 100 ते 120 सेमी  बाजरी जमिनीसाठी 120 ते 150 सेमी ठेवून सरीची लांबी उतारानुसार  20 ते 40 मीटर ठेवावी. पट्टा पदधतीने लागवड करायची असल्यास मध्यम जमिनीसाठी 75 ते 150 सेमी  भारी जमिनीसाठी 90 ते 180 सेमी पद्धतीचा अवलंब करावा. उसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्याची टिपरी वापरून करावी. एक डोळा लागवडीसाठी दोन डोळ्यातील अंतर 30 सेमी ठेवावे व दोन डोळ्यांसाठी 15 ते 20 सेमी ठेवावे.
एक डोळा रोपांपासून ऊस लागवड
काही साखर कारखाने, काही संशोधन केंद्र आणि काही खाजगी रोपवाटिकेमध्ये आता उसाची रोपे विक्रीस उपलब्ध आहेत. प्लास्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 45 दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात.
Maharashtra sugarcane cultivation
उसाच्या दोन सरितील अंतर व एकरी लागणारी ऊस रोपे
आंतरपिके
आडसाली ऊसामध्ये भुईमुग, चवळी, सोयाबीन, भाजीपाला तर पूर्वहंगामी ऊसामध्ये बटाटा, हरभरा, कांदा,लसूण, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा आणि सुरू ऊसामध्ये उन्हाळी भुईमूग , कांदा, काकडी, टरबूज, कलिंगड, पानकोबी, फुलकोबी, नवलकोल, मेथी, कोथींबीर यासारखी आंतरपिके घेता येतात.
ऊस बेणे आणि प्रक्रिया
बेनेमळ्यात वाढविलेले 9 ते 11 महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास उत्पादनात 15 ते 20 टक्के वाद होते. ऊस बेणे लावणीपूर्वी 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम कार्बेन्डझिम 10 मिनिटांसाठी बेनेप्रक्रिया करावी. यामुळे बुरशीजन्य रोग व खवलेकिडीचा बंदोबस्त होतो.
एकात्मिक खत व्यवस्थापन
रासायनिक खतांचा असंतुलित वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता कमी झाली आहे. यासाठी सेंद्रिय, जैविक आणि यासायनिक अशी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे.
सेंद्रिय खते
सुरू, पूर्वहंगामी व आडसाली उसासाठी प्रती हेक्टरी अनुक्रमे 20 (40 गाड्या), 25 (50 गाड्या), 30 (60 गाड्या) टन शेणखत अथवा पाचटाचे कंपोस्ट खत प्रती हेक्टरी 7 5 टन, प्रेसमड कंपोस्ट प्रती हेक्टरी 6 टन आणि गांडूळ खत प्रती हेक्टरी 5 टन ऊस लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगरटीच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी.
रासायनिक खते
Sugarcane cultivation in Maharashtra
हंगामनिहाय खतमात्रा देण्याचे वेळापत्रक (किलो/हेक्टर)
ठिबक सिंचनातून नत्रयुक्त खतांचे व्यवस्थापन
ठिबक सिंचनातून देण्यासाठी युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळणारे उत्तम नत्रयुक्त खत आहे. लग्निपासून मोठ्या बांधनिपर्यंत दर आठवड्याचा अंतराने समान 20 हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान 10 हप्त्यात नत्रखताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते. पारंपरिक स्पुरदयुक्त व पालाशयुक्त खते नेहमीप्रमाणे दोन समान हप्त्यांत ऊस लागणीच्या वेळी व मोठ्या बांधणीच्या वेळी जमिनीतून द्यावीत.
ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचे व्यवस्थापन
सुरू ऊसासाठी मध्यम खोल, काळया जमिनीत सुरू उसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि आर्थिक फायदयासाठी 80% विद्राव्य खते वरील तक्त्यानुसर दर आठवड्याला एक याप्रमाणे 26 हप्त्यात ठिबक सिंचनातून द्यावे. तसेच ठिबक सिंचनाद्वारे 100% बाष्पोपर्णोत्सर्जना एवढे पाणी एक दिवसाआड द्यावे.
Maharashtra sugarcane cultivation
ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचे वेळापत्रक
सूक्ष्म अन्नद्रव्ये
माती परीक्षण आधारे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मॅंगेनिज सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स प्रती हेक्टरी चांगल्या कुजलेल्या शेणखतात (10:1) 2 - 3 दिवस मुरवून सरीमध्ये चरी घेऊन मातीआड करावे. स्पुरदयुक्त खतांसाठी शक्यतो सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा. त्यामुळे गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची वेगळी मात्रा द्यावी लागणार नाही.
उसाची लागण आणि सलग दोन खोडव्याचे अधिक उत्पादन घेण्यासाठी हेक्टरी 400 किलो सिलिकॉन देण्यासाठी बॅगॅस अॅश (1.5 टन / हेक्टर) किंवा कॅल्शिअम सिलिकेट (832 किलो / हेक्टर) च्या माध्यमातून ऊस लागवडीच्या वेळी एकदाच द्यावा.
आंतरमशागत
पिके 4 महिन्याचे होईपर्यंत 2 - 3 खुरपण्या कराव्यात व दातेरी कोळप्याने 2 - 3 कोळपण्या कराव्यात किंवा तणांचा बंदोबस्त करण्यासाठी ऊस लागण केल्यावर 3 - 4 दिवसांनी जमीन वापश्यावर असताना 5 किलो अॅट्राझिन किंवा मेट्रीब्युझिन 1.25 किलो/ हेक्टरी 1000 लिटर पाण्यात विरघळवून संपूर्ण जमिनीवर फवारावे. तणांचे प्रमाण जास्त असल्यास ऊस लागण झाल्यानंतर 2 महिन्यांनी 2-4 डी 1.25 किलो/ हेक्टरी 500 लिटर पाण्यात विरघळवून तनांवर फवारावे किंवा 60 दिवसांनी कोळपणी करावी.
ऊस लागवडीनंतर 16 ते 20 आठवड्यांनी रासायनिक खतांची मात्रा देऊन औजाराने वरंबे फोडून आंतरमशागत करावी व रिजरणे मोठी बांधणी करावी.
पाणी व्यवस्थापन
आडसाली, पू्वहंगामी, सुरू व खोडवा उसाला अनुक्रमे 340 ते 350, 300 ते 315, 250 ते 275 व 225 ते 250 हेक्टर सेमी पाण्याची गरज असते. मोठया बांधणीपर्यंत सर्वसाधरणपणे पाण्याच्या पाळ्या 8 सेमी खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर 10 सेमी खोलीच्या पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी, पावसाळ्यात 14 ते 15 दिवसांनी व हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
AgriAmigo
खोडवा व्यवस्थापन
गाळपासाठी पक्व ऊस पिकाची जमिनीलगत तोडणी करावी, बुढके मोकळे करून पाचट सरित लोटावे. वरती राहिलेले बुदके धारधार कोयत्याने छाटावेत, छाटलेल्या बुढख्यावर 0.1 टक्के कार्बेन्डॅझिमची फवारणी करावी. सरीत लोटलेल्या पाचटावर 8 किलो युरिया, 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो पाचट कुजवणारे जिवाणू प्रती टन पाचटासाठी व खोडवा पिकास पाणी द्यावे. वापसा आल्यानंतर 50 टक्के रासायनिक खताची शिफारशीत मात्रा पहरीच्या साहाय्याने बेतपासून अर्धा फूट अंतरावर, अर्धा फूट खोलीवर व दोन खड्ड्यातील अंतर 1 फूट ठेवून सरीच्या बाजूने ऊस तुटल्यावर 15 दिवसांच्या आत द्यावी आणि उर्वरीत मात्रा याच पद्धतीने परंतु सरीच्या विरुध्द बाजूने 135 दिवसांनी द्यावी.
ऊसावरील महत्त्वाचे रोग
⏹चाबुक कानी 
कार्बेन्डॅझिमच्या 0.1 टक्के ( 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम) बेणे प्रक्रियेमुळे ऊसातील कानी रोगाचा बंदोबस्त होतो.
⏹पोक्का बोईंग व शेंडा कुज
ऊस पिकाच्या मुख्य वाढीचा काळ म्हणजे 3 - 7 महिन्याच्या ऊसामध्ये मान्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस व मान्सूनमुळे वाढलेल्या आर्द्रतेमुळे पोक्का बोईंग हा रोग पानावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. पानाच्या खालच्या भागात सुरुवातीस फिक्कट हिरवट, पिवळसर, पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात अशा पानांचा आकार बदलतो, लांबी कमी होते व खोडाकडील भाग अरुंद होऊन पाने एकमेकांत गुंफली जातात त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत. उसावर पोक्का बोईंग व शेंडा कुज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नियंत्रणासाठी 10 ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 10 - 15 दिवसांच्या अंतराने 3 फवारण्या करव्यात.
⏹तांबेरा
पानांवर हवेद्वारे प्रसारित होणारा ऊस पिकावरील तांबेरा हा एक महत्त्वाचा रोग आहे. सुरुवातीस बुरशीची लागण दोन्ही बाजूस होऊन पानावर लहान, तांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास 0.3% (3 ग्रॅम / लिटर पाणी) मॅन्कोझेब अथवा 0.1% टेब्युकोनॅझोल (1 ग्रॅम/ लिटर पाणी) फवारावे.
⏹गवताळ वाढ
गवताळ वाढ हा अतिसूक्ष्म जिवाणूंमुळे होणारा रोग आहे. उसाच्या बेटामधून असंख्य फुटवे येऊन अशी बेटे खुरटी राहतात. हे फुटवे निव्वळ पांढरट अथवा पिवळसर असून त्यांची पाने अरुंद, लहान, टोकाकडे निमुळती होत गेलेली दिसतात व त्यास गवतासारखे स्वरूप प्राप्त होते. बेणे उष्ण जलप्रक्रिया करून याचा प्रादुर्भाव टाळता येतो. शेतकऱ्यांनी दर 3 - 4 वर्षांनी बेनेबदल करावा.
ऊसावरील महत्वाच्या किडी
महाराष्ट्रात ऊसावर खोड कीड, कांडी कीड, हुमणी, पांढरा लोकरी मावा, पिठ्या ढेकूण, पाकोळी (पायरीला), पांढरी माशी आणि वाळवी या किडींचा प्रादुर्भाव काही भागात कमी अधिक प्रमणात दिसून येतो.
⏹खोड कीड
ऊसामध्ये खोड किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एकरी दोन फुले ट्रायकोकार्डची 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारणे करावीत. खोडकिडीच्या प्रभावी नियंत्रासाठी क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल 18.5 % ए.सी. 3 - 4 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून अथवा क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल 0.4 % दाणेदार 18.75 किलो प्रति हेक्टर अथवा क्लोरोपायरिफाॅस 20 % ईसी 12 ते 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून अथवा सायपरमेथरिन 10% ईसी 12 - 15 मिली प्रती 10 लिटर पाणी अथवा फिप्रोनिल 0.3% दाणेदार 2.5 ते 3.3 किलो प्रति हेक्टर अथवा क्विनॉलफॉस 25% ईसी प्रती 10 लिटर पाण्यातून वापरावे.
⏹हूमणी
हुमानीच्या नियंत्रणासाठी वळवाचा पहिला पाऊस झाल्यानंतर निंबु, बाभूळ, बोर या झाडावरील भुंगेरे प्रकाश कंदील व रॉकेलचा वापर करून सामुदायिकरित्या रात्रीच्या वेळी गोळा करून नष्ट करावेत तसेच फोरेट 10% दाणेदार 25 किलो प्रति हेक्टरी वापरावे.
⏹कांडी कीड
कांडी किडींचा नियंत्रणासाठी एकरी दोन ट्रायकोकार्ड मोठ्या बांधणीनंतर दर 15 दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी एक   महिन्यापर्यंत लावावीत.
⏹पिट्ट्या ढेकूण
पोग्यातील पिट्ट्या ढेकूण या किडींचा बंदोबस्तासाठी मोनोक्रोटोफॉस 36% प्रवाही 15 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मोनोक्रोटोफॉस हे औषध भाजीपाला पिकांसाठी प्रतिबंधित असल्याने ऊसात भाजीपाला पीक असल्यास याचा पवार टाळावा.
⏹लोकरी मावा 
लोकरी मावा नियंत्रणासाठी कोनोबाथ्रा, मायक्रोमस, डिफा   अशा मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
ऊस तोडणी
ऊस तोडणी हांगमनिहाय व पक्वता पाहून करावी. तोडणीपूर्वी पिकाचे पाणी 15 दिवस बंद करावे.तोडलेला ऊस ताबडतोब गाळपासाठी पाठवावा. सुरू 12 - 13 महिने, पूर्वहंगामी 14 - 15 महिने, आडसाली 16 - 18 महिन्यात तोडणी करावी.

Comments

Post a Comment

नमस्कार मित्रांनो

Popular posts from this blog

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा

जनावरांतील पोटफुगी - कारणे, लक्षणे व प्रथमोपचार