एकात्मिक किड व्यवस्थापन - परभक्षी कीटक

 1) क्रायसोपा (क्रायसोपर्ला कार्निया) 
क्रायसोपाची अळी व प्रौढ मृद शरीर वर्गीय रस शोषणार्या किडी
 उदा. मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, तसेच बोंडअळीची अंडी, प्रथमावस्थेतील अळ्या, पिठ्या ढेकूण व खवले किडींची पिल्ले खाते.
यांचा उपयोग कापूस, मका, सूर्यफूल, भाजीपाला व फळबागात आढळून येणार्या वरील किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
प्रसारण मात्रा: १०,००० अळ्या/हेक्टर.
agriamigo | predators
agriamigo | predators


2) ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड भुंगेरे (क्रिप्टोलीमस)-विविध प्रजातींच्या पिठ्या ढेकणाची अंडी, पिल्ले व प्रौढ अवस्थांवर उपजीविका करतात. त्यांचा उपयोग द्राक्ष, सीताफळ, लिंबू, डाळिंब, आंबा, चिकू या वरील पिठ्या ढेकूण, कापशी व उसावरील पिठ्या ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी होतो.
प्रसारण मात्रा: २,५०० अळ्या / हेक्टर
३) लेडीबर्ड भुंगेरे:- 
बहुतांशी पिकावरील रस शोषणार्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आणि पिठ्या ढेकणाची पिल्ले यावर उपजीविका करतात. हे परभक्षी कीटक कापूस, मका, ज्वारी, उस, गळीतधान्य, भाजीपाला व फळझाडवरील या किडींच्या नियंत्रणाचे कार्य नैसर्गिकरीत्याच करत असतात.
agriamigo | biological control
4) डीफा (कोनोबाथ्रा) – 
याची अळी उसावरील लोकरी मावा खाते. पूर्णावस्थेतील अळी ३०० पेक्षा जास्त मावा खाते. एक अळी पानावरील लोकरी मावा ४ ते ५ दिवसात संपवते.
प्रसारण मात्रा: उसावर लोकरी मावा दिसून येताच १,००० अळ्या तथा कोष प्रति हेक्टर.
agriamigo | biological control difa

५) मायक्रोमस:
या कीटकांच्या अळ्या व प्रौढ प्रामुख्याने उसावरील लोकरी मावा तसेच माव्याच्या इतर प्रजातींवर उपजीविका करतात.
प्रसारण मात्रा: लोकरी मावा दिसून येताच २५०० अळ्या/ हेक्टर.

६) सिरफीड माशी:
या परभक्षी कीटकांची अळी उसावरील लोकरी मावा, मका, ज्वारीवरील मावा, कोबीवर्गीय इतर भाजीपाला पिकातील माव्यावर उपजीविका करतात.
 हे कीटक निसर्गत:च उपलब्ध असतात.
agriamigo | कीड नियंतरणासाठी

Comments

Popular posts from this blog

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा

ऊस लागवड

फळबागेतील तण व्यवस्थापन