डाळिंब लागवड आणि व्यवस्थापन
जमीन : हलकी ते मध्यम (40 सेमी खोली असलेली हलकी जमीन)
जाती : गणेश, मृदुला, फुले आरक्ता, फुले भगवा सुपर, फुले अनारदाना (अनारदाना तयार करण्यासाठी)
लागवडीचे अंतर : 4.5×3.0 मीटर
खते : पूर्ण वाढलेल्या झाडास चांगले कुजलेले शेणखत 40 ते 50 कील, नत्र 625 ग्रॅम, स्पुरद 250 ग्रॅम, 250 ग्रॅम प्रति झाडास प्रती वर्ष. नत्र दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे.
✓ रोपांची खरेदी खात्रीशीर शासनमान्य रोपवाटिकेतून करावी.
✓ डाळिंबाचा लागवड 4.5×3.0 मीटर अंतरावर करावी त्यापेक्षा कमी अंतरावर लागवड प्रकर्षाने टाळावी कारण अशा बागेत तेल्या बरोबर मर रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढते.
✓ रोप लागवडीनंतर दोन वर्षांनी पहिला बहार धरावा त्यापूर्वी बहार धरल्यास झाडे कमकुवत व अशक्त राहिल्याने रोगास लवकर बळी पडतात.
✓ अधिक आर्थिक फायद्यासाठी 4.5×3.0 मीटर अंतरावर लागवड केलेल्या डाळिंबामध्ये ठिबक सिंचनाने झाडाजवळचे 20% क्षेत्र पणेने ओलिताखाली येणे आवश्यक असते. त्यापेक्षा जास्त हवामान ओलिताखाली आल्यास बागेत सूक्ष्म हवामान तयार होऊन खोडाला लहान छिद्र पडणारे भुंगेरे व मर रोग यांचा प्रादुर्भाव वाढतो.
✓ खोडकिडीचा जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या भागामध्ये हलक्या जमिनीत डाळिंबाला चार खोडे ठेवून अकर देणे फायदेशीर ठरते.
✓ वर्षातून एकच बहार धरावा. बहार धरल्यानंतर झाडाच्या आकारानुसार नियंत्रित फळे ठेवावीत त्यामुळे फळांचा आकार वाढून दर्जेदार फळ उत्पादन शक्य होते.
✓ गुणवत्तापूर्ण उत्पंनासाठी सूक्ष्म खतांचा व जिवाणू खतांचा वापर फायदेशीर दिसून आला आहे.
✓ खते झाडाच्या घेऱ्याजवळ ड्रिपरच्या खाली टाकून मातीने झाकवित.
✓ रोगट फांद्या, पाने व फळे बागेपासून दूरवर जाळून नष्ट करावेत.
डाळिंब किडी
1. रस शोषणारा पतंग
जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस झाल्यानंतर पतंग मोठ्या संख्येने उदयास येतात. जेव्हा फळे अर्धवट पिकलेली असतात तेव्हा रात्रीच्या वेळी त्यांची लांब टोकदार सोंड फळामध्ये खुपसतात आणि रस शोषून घेतात. मग छिद्र पडलेल्या ठिकाणी फळे नासायाला सुरुवात होते आणि फळे पक्व होण्यापूर्वीच गळून पडतात.
नियंत्रण
✓ फळांना बॅगींग करावे.
✓ गळलेली फळे त्वरित गोळा करून नष्ट करावीत.
✓ बॅटरीच्या साहाय्याने रात्री पतंग पकडून मारावेत.
✓ विषारी सापळा बनवून बागेत ठेवावे ( 20 मिली मॅलॅथिऑन + 200 ग्रॅम गूळ + 2 लिटर पाणी )
✓ बागेत रात्री धूर केल्यास पतंग येत नाहीत.
2. फळे पोखरणारी अळी
अळी फळाला भोक पाडून आतील गर आणि दाने खाते. अशी फळे कालांतराने नासायला सुरुवात होते आणि फळे गळून पडतात.
नियंत्रण
✓ फळांना बॅगींग करावे.
✓ गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
3. खोडाला लहान छिद्र पाडणारे भुंगेरे (शॉट होल बोरर)
✓ खोडाला लहान छिद्र पाडणारे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 1 लिटर पाण्यात गेरू रात्रभर भिजवावा.दुसऱ्या दिवशी त्यामध्ये 5 मिली क्लोरोपायरिफॉस प्रती लिटर पाणी याप्रमाणे मिसळून झाडांना मुलामा द्यावा..


Comments
Post a Comment
नमस्कार मित्रांनो