जनावरांतील पोटफुगी - कारणे, लक्षणे व प्रथमोपचार

कधीकधी रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये पोटफुगीची लक्षणे दिसून येतात. पोटातील वायू बाहेर नपडल्यामुळे ही समस्या आढळते.
पोटफुगी : रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या पोटात खाद्याचे पचन होत असताना वायू निर्माण होत असतो तो शरीराबाहेर नपडल्यामुळें पोटफुगी होते आणि जनावर आजारी पडते.
Source
लक्षणे:
जनावरांच्या डाव्या अंगाकडील पोट पूर्णपणे फुगते आणि हाताने वाजविले असता आवाज घुमतो.
✓ पोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडत असते वारंवार लघवी व शेन टाकते.
✓ जनावर बैचेन व अस्वस्थ होते.
कारणे :
✓ अन्नातील कोबाल्टच्या कमतरतेमुळे, विषबाधेमुळे आणि प्लास्टिक खाल्ल्यामुळे पोटफुगी होते.
✓ खराब दर्जाचा चारा खाल्ल्यामुळे पोटफुगी होते.
पावसाळी हंगामात हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तो जनावरांना भरपूर प्रमाणात खाण्यास मिळतो आणि त्याचे व्यवस्थित पचन नसल्यामुळे वायू निर्माण होऊन पोट फुगते.
✓ जनावर एकाच जागेवर हालचाल न करता बसलेल्या अवस्थेत असले तरीही पोटफुगी होवू शकते.
प्रथमोपचार :
✓ वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जर पोट टणक झाले असेल तर दाभनाने किंवा जाडसर इंजेक्शनच्या सुईने मणका व कटिबंधातील हाड यांच्या तयार झालेल्या त्रिकोणाच्या डाव्या बाजूस छिद्र पाडावे जेणेकरून पोटातील वायू बाहेर पडेल.
Source
✓ जनावरांच्या तोंडामध्ये बोटे घालून पडजिभेच्या स्नायूंना उत्तेजीत करावे. जेणेकरून ढेकर येऊन वायू बाहेर पडेल.
शक्य असल्यास जनावरांच्या अन्ननलिकेत जाऊ शकेल अशी रबरी नळी पोटात सोडावी व पोटातील वायू बाहेर काढावा. ही क्रिया काळजीपूर्वक करावी जनावरांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
✓ जनावरांतील फुगलेल्या पोटाच्या अंगावर बाहेरून जोरजोराने तेलाने चोळून मालिश करावी व त्याला चालण्यास किंवा पळण्यास लावावे.
✓ जनावरांच्या तोंडत थोडा वेळ काठी बांधून ठेवावी जेणेकरून पोटात साठलेला वायू बाहेर पडेल.
✓ घरगुती प्रथमोपचार म्हणजे 500 मिली गोडेतेल आणि टरपेंनटाईनचे तेल 30 ते 40 मिली मिसळून जनावरास हळूहळू पाजावे.
पोटफुगी होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी :
✓ पावसाळी हंगामात हिरवा चारा मर्यादित व गरजेपुरताच
द्यावा.
✓ तसेच जनावरास भरपूर प्रमाणात व्यायाम द्यावा.
✓ चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध करून द्यावा. नित्कृष्ट दर्जाचा चारा देणे टाळावे.
✓ चाऱ्यामधे प्लॅस्टिकच्या पिशव्या, तारा, खिळे, जाड घन पदार्थ जाणार नाही याची काळजी घ्यावी.
✓ जनावरांना एका कुशीवर/ अंगावर जास्त वेळ बसू देऊ नये.
पोटफुगीची लक्षणे दिसून येताच ताबडतोब गोडेतेल पाजावे.
हिरव्या चारया बरोबर काही प्रमाणात कोरडा चारही द्यावा.
फक्त ओला चारा देणे टाळावे. गाई म्हशीमध्ये हिरव्या चार्यमुळे पोटफुगी होण्याचे प्रमाण साधारणतः 20 टक्के आहे.


Comments

  1. सर गायीने गहू च्या पिठाचा गोळा खाल्ला आहे आणि गायीचे पोट फुगले आहे

    ReplyDelete
  2. सर म्हैस व्यवस्थित वैरण खात नाही काय करावे?

    ReplyDelete
  3. सर गाय रवंथ करत नाही

    ReplyDelete

Post a Comment

नमस्कार मित्रांनो

Popular posts from this blog

ऊस लागवड

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा