टोन्ड, डबल टोन्ड दूध म्हणजे काय?
१. प्रमाणित दूध या प्रकारच्या दुधात नियमाप्रमाणे फॅट व इतर घन पदार्थ प्रमाणित केले जातात. हे प्रमाण अनुक्रमे 4.1 व 8.5 टक्के फॅट व फॅट इतर घन पदार्थ असावे. या प्रक्रियेमध्ये ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्तचे घटक कमी करण्याची व कमी पडणारे घटक त्यात मिसळण्याची सवलत असते. मात्र हे करत असताना धुग्धजन्य घटकच वापरणे आवश्यक आहे. इतर कोणतेही रासायनिक घटक नव्हे.
३. टोन्ड दूध नियमानुसार आवश्यक 3.0 टक्के फॅट व 8.5 टक्के फॅट विरहित घनपदर्थाचे प्रमाण राखताना म्हशीच्या दुधात बाहेरून पाणी व स्कीम मिल्क पावडर मिसळून टोन्ड दूध तयार केले जाते.
४. डबल टोन्ड दूध या प्रकारचे दूध टोन्ड दूध करताना जी प्रक्रिया केली जाते तशीच करतात. मात्र डबल टोन्ड दूधातिल फॅट व इतर घन पदार्थाचे प्रमाण अनुक्रमे 1.5 व 9.0 टक्के अपेक्षित असते.
वरील सर्व दुधाकरीता दुध प्रक्रिया केंद्रावर करायच्या सर्व प्रक्रिया म्हणजेच होमोझीनिझेशन, पाचरिझेशन, चीलींग, पकिंग, वाहतूक आदी प्रक्रिया नेहमीप्रमाणे करायच्या असतात.

Comments
Post a Comment
नमस्कार मित्रांनो