डाळिंब मर रोग व्यस्थापन

डाळिंब लागवडीसाठी चांगला निचरा होणारी हलकी मध्यम प्रतीची जमीन निवडावी.
✓ लागवड करण्यापूर्वी जमीन प्रखर सूर्यप्रकाशात तापवून घ्यावी.
✓ रोगविरहीत बागांमधील गुटी पासून तयार केलेलीच रोपे लागवडीसाठी वापरावी.
✓ लागवडीसाठी 2×2×2 मीटर आकाराचे खड्डे 4.5 मी × 3.0 मी अंतरावर घ्यावेत. याप्रमाणे हेक्टरी 740 झाडे बसतात. मर रोग जमिनीतून मुळ्यांद्वारेसुध्दा पसरतो म्हणून कमी अंतरावरील लागवड रोग बळावण्यास मदत करते.
✓ खड्डे उन्हाळ्यात लागवडीच्या एक महिना अगोदर घेऊन उन्हात तापू द्यावेत. यामुळे काही प्रमाणात नैसर्गिक निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
✓ खड्यांमध्ये कार्बेन्डझिम 0.2 टक्के द्रावण 5 लिटर प्रति खड्डा वापरावे.
✓ भारी जमिनीत खड्डे भरताना त्यामध्ये माती आणि वाळू 1:1 या प्रमाणात घेऊन प्रत्येक खड्यात खालील पदार्थ टाकावेत.
शेणखत 20 किलो, गांडूळखत 2 किलो, निंबोळी पेंड 3 किलो, ट्रायकोडर्मा प्लस 25 ग्रॅम, अझोटोबॅक्टर 15 ग्रॅम, स्पुरद जीवाणू 15 ग्रॅम.
✓ पाणी व्यव्थापनाचे योग्य नियोजन करावे.
✓ मर रोगाची काही महत्वपूर्ण लक्षणे डाळिंबाचा इतर भागावरही दिसून येतात म्हणून संपूर्ण झाड कार्बेन्डझिम द्रावणाने फवारावे.
✓ मर रोगाने संपूर्ण वाळलेले, मेलेले आणि कोरडे झालेले झाड ताबडतोब उपटून नष्ट करावे. अशी रोगट झाडे जाळण्यासाठी नेताना त्याची रोगट मुळे प्लॅस्टिक पिशवीच्या साहाय्याने झाकून घ्यावीत. कारण बुरशीचे जीवाणू मोठ्या प्रमाणात मुळांवर/मुळांमधे असल्यामुळे चांगल्या झाडांना रोगाची लागन होण्याची शक्यता असते.
✓ झाडांची छाटणी पावसाळ्यात किंवा उन्हाळा सुरू होण्या अगोदर करू नये. कारण या कालावधीत किडींचा प्रसार होतो. कोडी छाटलेल्या पेशिरसाकडे आकर्षिले जातात आणि रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.
✓ छाटलेल्या भागांना 10 टक्के बोर्डो पेस्ट लगेच लावावी.
डाळिंबाच्या खोड किडीच्या नियंत्रणासाठी (जो मर रोगासही कारणीभूत ठरतो) 10 लिटर पाण्यात गेरू 4 किलो, कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम या प्रमाणात मिसळून झाडाच्या खोडाला जमिनीपासून दोन फुटांपर्यंत दुसऱ्या वर्षापासून लावावे. गेरू रात्रभर भिजत ठेवून त्यात दुसऱ्या दिवशी ही औषधे मिसळावीत.
✓ सुतकृमी नियंत्रणासाठी आफ्रिकन झेंडू दोन झाडांच्या व ओळींच्या मधल्या रिकाम्या जागेत किंवा झाडाभोवती गोल कडेने लावावे. सुतकृमिंची संख्या कमी होण्यास मदत होते. चांगल्या निष्कर्षसाठी 4 ते 5 महिने झेंडूची लागवड करावी.
✓ बागेची स्वच्छता आणि निगा चांगल्याप्रकारे ठेवावी.


सुतकृमी नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय

✓ डाळिंबाचा बहार धरताना जमिनीत हेक्टरी 1.5 - 2 टन निंबोळी पेंड खोडाभोवती मुळांजवळ मातीत मिसळावे.
✓ बागेमध्ये पॅसिलोमाइसिस व ट्रायकोडर्मायुक्त परोपजीवी बुरशीजन्य पावडर 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ ओतावे. तसेच हिरवळीचे खात म्हणून तग, धैंचा इत्यादीचा वापर करावा.
✓ जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या बागेत आफ्रिकन झेंडूची झाडाभोवती गोल कडेने लागवड करावी. बऱ्याच डाळिंब बागांमध्ये सद्यस्थितीत सुतकृमिंचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याचे आढळून आले आहे.
✓ मर रोग वाढण्यास सुतकृमी हा एक प्रमुख घटक असल्याने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण या सुतकृमिंच्या प्रादुर्भावामूळे फुजारियम बुरशीचा शिरकाव झाडांमध्ये मुळांद्वारे इजा झाल्याने सहजपणे होतो आणि पर्यायाने मर रोगाचा प्रार्दुभाव होऊन झाडे मरण्यास सुरुवात होते.

Comments

Post a Comment

नमस्कार मित्रांनो

Popular posts from this blog

ऊस लागवड

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा

जनावरांतील पोटफुगी - कारणे, लक्षणे व प्रथमोपचार