टोमॅटो
टोमॅटो मध्ये सर्वात हानिकारक कीड म्हणजे नाग आळी, नाग आळीचा प्रादुर्भाव सुरवातीपासूनच होतो तो टाळण्यासाठी खालील कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या जेणेकरून खर्च कमी आणि उत्पन्न चांगले मिळेल.
नाग अळी
🍅टोमॅटो पीकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पिवळे / पांढरे पट्टे दिसले की नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे.
🍅या अळीचे प्रौढ रूप काळी माशी असते.
🍅काळी माशी पानाच्या मागील बाजूने एकावेळी 150 ते 250 पर्यंत अंडी घालते.
🍅सुमारे 9 ते 10 दिवसात अंडी उबून त्यातून छोट्या अळ्या बाहेर पडतात.
🍅पानाच्या दोन शिरामध्ये शिरून ही अळी एक प्रकारे भुयार तयार करते.
🍅ही अळी पानातील टिश्यू खात - खात पुढे सरकत जाते, तो प्रवास म्हणजे नागमोडी पट्टे असतात.
🍅दोन - तीन आठवड्यात अळीची पूर्ण वाढ झाली की ती पानाच्या बाहेर पडून जमिनीवर येते व दोन - तीन इंच मातीत खोल जाऊन तिचे कोषात रुपांतर होते.
🍅१५ दिवसांनी त्या कोषातून काळी माशी बाहेर पडते.
🍅या किडीने टोमॅटो पिकाचा दर्जा बिघडतो.
🍅नागळीच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाच्या पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते, त्यामुळे उत्पादन घटते.
🍅हिवाळ्यात ही कीड सुप्तावस्थेत राहते आणि तापमान वाढू लागताच तिचा प्रादुर्भाव सुरु होतो.
🍅पानाच्या आत या अळीचे वास्तव्य असल्याने कीटकनाशकाच्या फवारणीचा फारसा उपयोग होत नाही.
उपाय
*1.सायान्ट्रानिलीप्रोल १०.२६% ओडी (बेनिविया):-* टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घेणे.(360 मिली प्रति एकर)
PHI- 3 दिवस
*2.क्लोरानट्रानिप्रोल ८.८ + थायोमिथोझाम १७.५ एस.सी. (व्हॉलीयम फ्लेक्सी)* :-टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी 200 मिली प्रति एकर या प्रमाणात जमिनीतून आळवणी करणे.
PHI- 36 दिवस

Comments
Post a Comment
नमस्कार मित्रांनो