उसाचे वाढे - सावधान

उसाचे वाढे खाऊ घालताना खालील काळजी घ्यावी.
कधीकधी शेतकरी हिरवी वैरण ऊपलब्ध नसताना उसाचे वाढे वैरण म्हणून वापरतात. उसाचे वाढे है वैरण नाही कारण यामधे प्रथिने १.५% टक्के इतकयाच प्रमाणात असतात. त्यात "ऑक्झलेट" हा अपाय कारक घटक असतो, ज्यामुळे खाणाऱ्या पशुच्या शरीरातील कॅल्शियम हा महत्वाचा क्षार बऱ्याच प्रमाणात शरीरा बाहेर फेकला जातो, पशु आवडिने खातों म्हणून वैरणीत १००% वाढे वापरु नये.
कॅल्शियम च्या कमतरते मुळे खालील दुष्परिणाम होतात
१. गर्भपाताचे प्रमाण वाढ़ते.
२. माजाचा स्त्राव कमी असतो वा अजिबात नसतो.
३. गर्भाशय व कासेचे आजार वाढतात.
४. जार अड़नयाचे प्रमाण वाढ़ते.
५. माज मुक़ा अनियमित किंवा दुर्बल असतो.
६. दुधाची प्रत खालावते.
७. दूध उत्पादन कमी होते.
८. दूध ज्वर होण्याची शक्यता बळावते.
त्यामुळे फक्त उसाचे वाडेच खाऊ घालु नये त्यासोबत इतर पोषक आहार, सुके वैरण , चुनी, खनिज मिश्रण, खड़े मीठ, ढेप, गुळ , कड़धान्य /एकदलीय चारा यापैकी चालू ठेवावे.
उसाचे वाढे खाऊ घालताना खालील प्रक्रिया करा :
⏹शक्यतो हिरवे उसाचे वाढे जनावरास घालू नये. ते उभे करून सुकू द्यावे जेणेकरून त्यातील विषारी घटकाचे प्रमाण कमी होईल.
⏹1 लीटर पाण्यात 20 ग्राम मीठ विर्घळवून घ्या 2 किलो कळीच्या चुन्यात 15 ते 20 लीटर पानी टाकून ठेवावे, प्रति 12 तासाने त्या मधील 3 लीटर निवळी काढ़ा, 10 किलो उसाच्या वाढया वर किंवा त्याच्या कुट्टीवर 1 ते 1.5 लीटर चुनयाची निवळी आणि मिठाचे द्रावण शिंपडा, 12 तास मुरु दया नंतर खायला द्यावे.
अशा प्रकारे प्रक्रिया केलेले वाढे खाऊन पशुस काही अपाय होत नाही.

Comments

Popular posts from this blog

ऊस लागवड

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा

जनावरांतील पोटफुगी - कारणे, लक्षणे व प्रथमोपचार