अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे आणि त्यावरील उपाय


नत्र झाडाची खालची पाने पिवळी होतात मुळाची व झाडांची वाढ थांबते, फ्रुट व फळे कमी येतात.
१% युरियाची फवारणी करावी.(१०० ग्रॅम + १० लिटर पाणी
स्फुरद पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागील बाजू जांभळट होते.
१% डायमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी. (१०० ग्रॅम + १० लिटर पाणी)
पालाश पानांच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.
खोड आखूड होवून शेंडे गळून पडतात.
०.५% हिराकसची अथवा फेरस अमोनियम सल्फेटची फवारणी करावी. (५० ग्रॅम + १० लिटर पाणी)
लोह शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो. झाडांची वाढ खुंटते.
०.५% हिराकसची अथवा फेरस अमोनियम सल्फेटची फवारणी करावी. (५० ग्रॅम + १० लिटर पाणी)
बोरॉन झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात.
सुरकत्या पडून पिवळे चट्टे पडतात.
फळावर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात.
५ ते १० ग्रॅम बोरीक असिड पावडरची १० लिटर पाण्यातून पानावर फवारणी करावी.
जस्त पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. व पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात.
हेक्टरी १० ते २० किलो झिंक सल्फेट जमिनीतून देणे किंवा ५० ते १०० ग्रॅम झिंक सल्फेट १० लि. पाण्यातून पिकावर फवारावे.
मंगल पानांच्या शिरा हिरव्या व शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो, संपूर्ण पान फिकट होवून नंतर पान गळते.
हेक्टरी १० ते २५ किलो मँगेनीज सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा १% मॅगेनीज सल्फेट फवारावे. (१०० ग्रॅम + १० लिटर पाणी)
मॉलिब्डेनम पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्रवतो.
हेक्टरी २५० ते ५०० ग्रॅम सोडियम मॉलिब्डेट जमिनीतून द्यावे.
तांबे झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते, झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो. खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात. मोरचूद ४० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
⏹गंधक झाडांच्या पानांचा मुळचा हिरवा रंग कमी होतो व नंतर पाने पूर्ण पिवळी पांढरी पडतात. हेक्टरी २० ते ४० किलो गंधक जमिनीतून द्यावे.
अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे | लक्षणे | सूक्ष्म अन्नद्रव्ये

Comments

Popular posts from this blog

ऊस लागवड

काकडी लागवड व व्यावस्थापन

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा