शंखी गोगलगाय एकात्मिक व्यवस्थापन
▣ शेताचे बांध स्वच्छ ठेवावे जेणेकरून गोगलगाय लपण्यास जागा राहणार नाही.
▣ गोगलगायीचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात द्राक्ष बागेमध्ये खोडा शेजारी अच्छादन (मल्चिंग) करण्याचे शक्यतो टाळावे.
▣ संध्याकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खड्ड्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकावी.
▣ संध्याकाळचे वेळी शेतामध्ये ठीकठिकाणी गवताचे ढीग 20 - 25 फूट अंतरावर ठेवावेत व सकाळी त्याखाली दडलेल्या गोगलगायी गोळा कराव्यात. तसेच पिकाच्या मुळा शेजारी गोगलगायींनी घातलेली पिवळसर पांढऱ्या रंगाची ( 100 ते 150 च्या पुंजक्यात) साबुदाण्याच्या अकारायची अंडी गोळा करून नष्ट करावीत.
▣ बांधाच्या शेजारी 4 इंच रुंदीचा तंबाखू किंव्हा चुन्याच्या भुकटीचा पट्टा टाकावा. त्यामुळे गोगलगायींना शेतात येण्यापासून अटकाव करता येईल.
▣ गोगलगायींना द्राक्षवेलीवर चढण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी 1 इंच रुंदीची तांब्याची पट्टी खोडाभोवती गुंडाळावी किंवा प्लॅस्टिकची पिशवी खोडा भोवती तसेच आधाराचे बांबू खांब इत्यादीवर गुंडाळून त्यावर घट्ट ग्रीसचा थर द्यावा.
▣ मेटाल्डीहाईड कीटकनाशकाच्या वापरासाठीच्या तयार गोळ्या स्नेलकिल या नावाने बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात संध्याकाळचे वेळी 5 किलो/हेक्टर या प्रमाणात पसरून करावा.
▣ पिकलेली उंबराची फळे, पपई त्याचप्रमाणे चिरडून निघालेल्या गोगलगायी त्यांच्याकडे आकर्षित होऊन इतर गोगलगायी हे पदार्थ आवडीने खाताना आढळून आले आहेत. त्यांचा आमिष तयार करण्यासाठी उपयोग करून घेणे शक्य आहे. वर नमूद केलेली उपाययोजना प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये एकत्रितपणे एकाच वेळी सर्वांनी राबवणे गरजेचे आहे. ही कीड थंडी उन्हाळ्यामध्ये (ऑक्टोबर ते मे) जमिनीमध्ये खोलवर सुप्तावस्थेत असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीतून बाहेर पडते व जून ते सप्टेंबर दरम्यान सक्रिय राहते. म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या किडीच्या नियंत्रणासाठी सलग 2 ते 3 वर्षे राबवणे आवश्यक आहे.

Comments
Post a Comment
नमस्कार मित्रांनो