फळबागेतील तण व्यवस्थापन

फळबागेतील झाडांना देण्यात येणारी खते पाणी व सेंद्रिय खते यामुळे गवतवर्गीय तसेच द्विदल वर्गीय तणांचा प्रादुर्भाव आढळतो. ही तने विशेषतः झाडाच्या भोवताली मोठ्या प्रमाणावर आढळतात. यासाठी फळबागेतील तर ना नियंत्रणासाठी एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीचा वापर करा.
प्रतिबंधात्मक उपाय
❏ बहुवार्षिक तणे पाऊस सुरू होण्यापूर्वी मुळासकट काढून टाकावीत.
❏ पाऊस सुरू होण्यापूर्वी उन्हाळ्यात वेलवर्गीय तणांची मुळे व खोडे खणून काढावीत तसेच आवश्यकता भासल्यास 1% ग्लायफोसेटची फवारणी करावी.
❏ वर्षायू हंगामी तणांच्या नियंत्रणासाठी द्विदल वर्गातील तनांसाठी अट्रॅझीन 50% डब्लूपी ‌‌(4कि/हेक्टर) ची फवारणी करावी.
❏ बहुवार्षिक तनांकरिता फळझाडांच्या दोन ओळीतील जागेत खोल नांगरट करावी अथवा मधल्या जागेत कडधान्य हिरवळीची पिके घ्यावीत किंवा अच्छादन टाकून तणांचा बंदोबस्त करावा.
❏ पेरणी करता तणविरहित बियाणे वापरावे.
पूर्ण कुजलेली सेंद्रीय खते वापरावीत.
❏ मशागतीची अवजारे स्वच्छ करूनच वापरावीत.
❏ तनयुक्त जागेतील मातीचा वापर टाळावा.
❏ रोप पुनर्लागवडीच्या वेळी त्यासोबत तणांचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी.
❏ पाण्याच्या पाटाजवळील किंवा कुंपणालगतची तने काढून टाकावीत.
निवारणात्मक उपाय
तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांचा नायनाट करण्यासाठी वापरायच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात.
❏ यांत्रिक पद्धत : हाताने तन उपटणे, खुरपणी, हात खांदनी, मशागत, कापणी, छाटणी, तन क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे, अच्छादन करणे इत्यादी.
❏ स्पर्धात्मक जलद वाढणारी पिके घेणे, योग्य पीक पद्धतींचा अवलंब करणे, वेळेवर पेरणी, हेक्‍टरी रोपांची संख्या योग्य ठेवणे, योग्य पीक फेरपालट, आंतरपीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करणे तथापि फळबागेत फुलोऱ्यात व फळधारणेच्या वेळी कोणतेही आंतरपीक घेणे योग्य नाही कारण फुलोऱ्यात व फळधारणेच्या अवस्थेत फळझाडास ओलावा व अन्नद्रव्यांची अधिक गरज असते.
❏ जिवाणूंचा वापर करणे जैविक तणनाशकांचा वापर करणे.
रासायनिक पद्धतीने तनांचा बंदोबस्त करणे.
तणनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी
❏ तणनाशके नामांकित कंपनीची खरेदी करावीत.
तणनाशके खरेदी करताना खरेदी केलेल्या तणनाशकाचे पक्के बील (पावती) घ्यावी.
❏ बिलावर तणनाशकाचे नाव, उत्पादक कंपनीचे नाव, बॅच नंबर, उत्पादन दिनांक व मुदत दिनांक, पिकाचे नाव व वापराचे प्रमाण नमूद केल्याची खात्री करावी.
❏ नजीकच्या 1 ते 1.5 महिना कालावधीत मुदत बाह्य होणारी तननाशके शक्यतो खरेदी करणे टाळावे.
❏ खरेदी करणारे तननाशक ज्या पिकाकरता वापरायचे आहे त्या पीकास सदर तननाशकाची शिफारस आहे किंवा कसे याची प्रथम खात्री करावी.
❏ खरेदी केलेले तननाशक शिफारशीत पिकामध्ये शिफारशीत केलेल्या फवारणी पद्धतीने व शिफारशीत मात्रेत फवारावे.
❏ फवारणी केल्यानंतर तणनाशकाचा प्रत्यक्ष परिणाम दिसेपर्यंत तणनाशक वेस्टने काळजीपूर्वक जतन करावेत व योग्य त्या परिणामाची खात्री झाल्यानंतरच वेस्टनांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
❏ तणनाशके बुरशीनाशके किंवा कीडनाशके एकत्रित ठेवू नयेत अथवा फवारून शिल्लक राहिलेले तननाशक रिकाम्या तणनाशकाच्या वेष्टनात साठवू नये कारण नजरचुकीने चुकीचे तणनाशक पिकावर करण्याची शक्यता असते.
फळबागेतील तण व्यवस्थापन | agriamigo | तन व्यवस्थानशास्त्र

Comments

Post a Comment

नमस्कार मित्रांनो

Popular posts from this blog

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा

ऊस लागवड

जनावरांतील पोटफुगी - कारणे, लक्षणे व प्रथमोपचार